पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महिला दिनानिमित्त कविता

एक दिवस साजरा करून 
अपमान नको इतर दिवशी 
महिला देखील माणूस आहे
खूणगाठ बांधा सर्व मनाशी

तिच्यातल्या ताकदीला घाबरून
आजही होते तिचे खच्चिकरण
स्वतःला वरचढ ठरवण्यासाठी
खेळले जाते घरोघरी राजकारण

चार चौघात करता अभिनय सुंदर
कौतुकाचे बांधता पूल हरभाऱ्यावर
दार बंद होताच वाहता शिव्यांच्या
लाखोल्या तिच्या निष्पाप आत्म्यावर

देवी म्हणून तुम्ही पुजण्याची तशी
तिला आवश्यकता भासत नाही
माणूस म्हणून फक्त समजून घ्यावे
याहून जास्त तिची अपेक्षा नाही

*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

© तनुजा प्रधान, अमेरिका.
शुक्रवार. ८ मार्च, २०२४.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू