पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डॉ. श्रीनिवास आठल्ये

मेघ बरसले!

दान धरेला आभाळाने प्रेमभराने पहा दिधले !
आनंदाने भरून आले... मेघ बरसले ||धृ||

वारा घाली गोंधळ ग
तरू वाजवी संबळ ग
कशी उडाली धांदल ग
सांगा कळ्यांनो, पानाआडुनी गाली खुदकन कोण हसले?
आनंदाने भरून आले...‌ मेघ बरसले ||१||

सृष्टी अवघी न्हाली ग
गाणी गाती वेली ग
चिंब पाखरे झाली ग
टपटपणारे थेंब टपोरे इवल्या चोची कुणी टिपले?
आनंदाने भरून आले... मेघ बरसले ||२||

धारा येती नाचत ग
पाणी जाई साचत ग
पोरे आली धावत ग
पहा कागदी होड्यांमधुनी लहानपण ते किती रमले!
आनंदाने भरून आले... मेघ बरसले ||३||

दान धरेला आभाळाने प्रेमभराने पहा दिधले!
आनंदाने भरून आले... मेघ बरसले ||

©डाॅ. श्रीनिवास आठल्ये, डोंबिवली
आषाढ शुद्ध दशमी, शके १९४४
शनिवार, दि. ९/७/२०२२
मोबाईल : ९२२३३७४३००
#डाॅ_श्रीनिवास_आठल्ये_मराठीकविता

-०००००-

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू