पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वंदे - मातरम् ।

वंदे - मातरम् ।

वंदे - मातरम् !
केवळ दोन शब्द ,
ज्यांचे उच्चार कानावर पडताच
अंगावर उभे रहात रोमांचं !
मुर्देही थडग्यातून उठून उठून चालू लागत !
शब्द नव्हतेच ते !
तो होता एक संजीवन मंत्र !
स्वातंत्र्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठी
एका द्रष्ट्या ऋषीला स्फुरलेला !
ज्याचा घोष करत करत
क्रांतिकारक फासावर चढत !
आणि तरुण आनंदाने छातीवर गोळ्या झेलत !
ज्याचा जयघोष होत होता
घराघराततुन !
वस्त्यावस्त्यातुन !
रस्त्यारस्त्यातुन !
ज्याचा जयघोष करीत होत्या
तुरुंगाच्या भिंती !
ज्याचा जयघोष करीत होत्या
शरीरातील पेशीपेशी !
आणि पेटून उठत होते
या देशाच्या मातीतील
प्रत्येक अणूरेणू !
ज्याच्या जागराने झाला होता
हवेतही विद्युल्लतेचा संचार !
ज्याच्या दाहकतेने निर्माण केला
टेम्सच्याही पाण्यात अंगार !
ज्याच्या आवर्तनाने दोलायमान झाले होते ,
महाराणीचे सिंहासन !
ते शब्द होते , " वंदे - मातरम् !"
तो मंत्र होता, " वंदे - मातरम् ! "
वंदे मातरम् ! वंदे मातरम् !

कवी -- अनिल शेंडे .

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू