पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विद्या विनयेन शोभते

परवा जवळच एका मैत्रिणी कडे गेले. बेल वाजवली, तिच्या 10 वर्षाच्या सौम्याने दार उघडले. 

मला बघताच "नमस्कार मावशी, या ना" म्हणाली. 

मी आत गेले, तिने तिच्या आईला बोलावून आणले, आमच्या साठी ट्रे मध्ये पाणी घेऊन आली.

बर, मी जाते हं, अभ्यास करायला… . म्हणत ती तिच्या खोलीत गेली. 

थंड वाऱ्याची झुळूक आली, असे वाटले. मी मैत्रिणीला म्हटले, खूप छान संस्कार केले आहे गं तू सौम्या वर! 

गोष्ट खूप लहान आहे, पण खूप महत्वाची आहे. आजकाल सौम्या सारखी मुलं खूप कमी आहे. 

मुलं "नमस्कार" हा शब्द विसरले आहे. रस्त्यात कोणी ओळखीचे भेटले की नमस्कार करण्याऐवजी चक्क नजर चोरून निघून जातात. 

मोठ्या माणसांना, गुरुजनांना नमस्कार करणे हा एक "बेसिक" संस्कार आहे. 

मोठमोठ्या शाळेत शिकून लाखो रुपयांची फी भरून जर मुलांना साधा नमस्कार करता येत नाही, घरी आलेल्यांना सन्मानाने आत बोलावून बसवता येत नाही, तर व्यर्थ आहे शिक्षण… 

कारण

 "विद्या विनयेन शोभते"

 

बघा, पटतंय का! 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू