पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रस्तावना

नमस्कार वाचक हो!

२०२३ वर्ष सरले. आमच्या प्रतिभावंत लेखकांनी शॉपिज़नवर आपल्या लेखणीचे ठसे उमटवले. या दरम्यान अतिशय सुंदर कथा वाचनात आल्या आणि नेहमीसाठी मनात घर करून गेल्या. 

वेगवेगळ्या धाटणीच्या या कथा होत्या. प्रेम कथा, कौटुंबिक कथा, सामाजिक कथा, रहस्य कथा इतर. काहीतरी वेगळा संदेश देणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या, चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवणाऱ्या तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावणाऱ्या!

तर २०२३ च्या उत्कृष्ट कथा लेखकांच्या कथांचा एक सुंदर संग्रह तुमच्यासाठी प्रस्तुत करत आहो..

वाचा, आनंद घ्या आणि आपल्या भावना प्रतिक्रिया स्वरूपात व्यक्त करा..

शॉपिज़नच्या लेखकांचे मनापासून धन्यवाद. २०२४ मधे सुद्धा आपण आपल्या साहित्याने शॉपिज़नची बाग नव्याने फुलवाल आणि तुमच्या लेखनाचा सुगंध आसमंतात दरवळेल या खात्रीसह...

सर्व लेखकांना आणि वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आपलीच,

ऋचा दीपक कर्पे

मराठी विभाग प्रमुख

शॉपिज़न 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू