पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनोगत

अशी विडंबन येती, आणिक मजा देऊनी जाती


मंडळी नमस्कार 


एखादी कविता, गाणे लिहिणे ही जर '  कला '  असेल  तर त्याचे विडंबन करणे हे  ' शास्त्र 'असते हे नक्की.   एकदा का या शास्त्रात पारंगत झाले की  तुमच्या प्रतिभेच्या पक्ष्याला  गगन भरारी मारायाला  ' Sky is the limit ' 


 मग  घरात या भिंतीवरुन त्या भिंतीवर जाणारी ' पाल ' - ही पाल तुरूतुरू चढती भिंतीवरती हळू ( मुळ गाणे: ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु) अशा विडंबन काव्यातून पळायला लागते. 


बायको माहेरी गेली की मग  ' तव्यावर केली मी बुर्जी बहाल, कसा आलाय रंग लाल जहाल' असं म्हणावं लागतं


अशा प्रासंगीक गोष्टीतून. विडंबनाचे   ' हे वेड मजला लागले' ( हेल्मेट आज मी घातले')   ते इतकं की अगदी  ' वडा-पाव खाता खाता' ( उष:काल होता होता) ही सहज विषय सुचू लागले. रस्त्यात रहदारीत अडकून ही मग  'मी ओळखून आहे सारी तुझी वहाने( मी ओळखून आहे,  सारे तुझे बहाने)


असा हा विडंबनाचा  खेळ व्हाटसप वर रंगत गेला ' खेळ मांडियेला व्हाटसप वरती बाई( खेळ मांडियेला वाळवंटी बाई)  . हा खेळ आता इतका रंगात आलाय की काय टाकिले व्हाटसपवरती( काय वाढिले पानावरती)  याची उत्सुकता अनेकांना राहू लागली आणि मग 'रचिले अॅडमिनमुनींनी त्यांचे ग्रुप अनंत ( रचील्या ऋषीमुनींनी त्यांच्या ऋचा अनंत)


हे सर्व शक्य झाले ते केवळ प्रासंगिक  'न्यूज पाहून सुचले सारे, टुकारच्या पलिकडले( शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले)


तर मंडळी ,  विडंबनाचे माझे पहिले इ बुक  सादर करताना आनंद होत आहे. काही निवडक १५ विडंबने आपणास वाचण्यास मिळतील.  माझे हे पहिले इ - पुस्तक विडंबनकार  ' आचार्य अत्रे ' यांना समर्पित . या  ईबुक साठी सर्व मदत देणारी ' ऋचा,  शॉपीझन परिवार आणि वेळोवेळी कोतुक करणारे मैफिल कुटूंबीय  याचे अनेक आभार 

 


अमोल केळकर 

२९/०६/२०२०

कांदे  नवमी 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू