पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनोगत

नमस्कार!

शॉपिज़नची गुणी मंडळी

विषय पाहुनी अती हर्षली

उत्साहाने व्यक्त जाहली

कवितांची रांगोळी सजली

शब्दांनी दशदिशा उजळली

साहित्याची मैफल रंगली

आनंदाची उधळण झाली

दीप उजळले आली दिवाळी....!

 

दिवाळी लेखन उपक्रमांतर्गत या दोन ओळी दिल्या होत्या,

"आनंदाची उधळण झाली

दीप उजळले आली दिवाळी"

तर...४५ कविता दिवाळी उपक्रमासाठी आल्या, सर्वच एकापेक्षा एक! सर्व कवितांचा समावेश ई-पुस्तकात केला आहे.

दिलेल्या ओळींचा वापर करून आपण अगदी लयबद्ध व अर्थपूर्ण कविता केल्या. मुख्य म्हणजे दिवाळीच्या धावपळीतून वेळ काढून साहित्य निर्मिती केली आणि खऱ्या अर्थाने साहित्यिक दिवाळी साजरी केली.

आपण सर्वांच्या उत्साहाने शॉपिज़न मंच पण उजळला, प्रकाशित झाला. त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना शॉपिज़न कुटुंबाकडून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

आपलीच,

ऋचा दीपक कर्पे

मराठी विभाग प्रमुख

शॉपिज़न 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू