मी स्मिता भोस्कर चिद्रवार म्हणजे नावाप्रमाणेच एक हसतमुख , सकारात्मक व्यक्तिमत्त्व . तशी कॉमर्स क्षेत्रातली पण नेहेमीच नवीन पिढी घडवण्याचं काम करण्याचा ध्यास घेत मुलांना हसत खेळत कठीण विषय शिकवण्यात हातखंडा असलेली .
मी अनेक वर्ष मुलांना शिकवण्याचे आणि त्याच बरोबर त्यांच्या समस्या सोडवत त्यांना कौन्सिल करत त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली . सध्या समाजातील ' स्पेशल ' मुलांना स्वावलंबी बनवण्याचा आणि त्यातूनच जगण्याची नवी प्रेरणा घेण्याचा माझा ध्यास आहे .
परदेशात असूनही आपल्या मातीशी माझे नेहेमीच मनातून नाते जपून ठेवले आहे . आपली भारतीय संस्कृती , संस्कार साता समुद्रापार नेऊन त्यांची जपणूक अगदी आनंदाने पुढच्या पिढीत रुजविण्यात मी नेहेमीच प्रयत्नशील असते .
लिखाण ही माझ्यासाठी आनंद देणारी गोष्ट आहे . मनाच्या गाभाऱ्यातून येणारे शब्द माझ्या लेखणीतून कोणाच्यातरी होठावर आनंद , हसू आणि एक चांगला विचार सहज , सुंदर पण अगदी मनाच्या जवळ असणाऱ्या लेखनशैलीतून करण्याचा माझा नेहेमीच प्रयत्न असतो .
'फिरुनी नवी जन्मेंन मी' ही कथा लिहिताना काही डोळ्यासमोर घडलेले प्रसंग , काही काल्पनिक प्रसंग यांची जोड देऊन एक कल्पनाविश्व निर्माण केले आहे .
वाचकांचे भरभरून प्रेम आजवर मिळत आले आहे आणि ते यापुढेही मिळत राहील अशी आशा करते .
तळपते लेखणी मनाचा घेऊन आधार ...
शब्द येतात मग सोबतीला आणि कथा होते साकार ...
या लघु कादंबरी ला तुम्हा सगळ्यांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
चूक भूल द्यावी घ्यावी ...
गोडी प्रेमाची तरीही चूक ही पदरात घ्यावी ...
माझ्या लेखणीतून साकारलेली ही कथा गोड मानून घ्यावी !