"बाईपण" ते "आईपण" हा प्रवास सोपा नसतो. आई होणे म्हणजे त्या स्त्रीचा दुसरा जन्मच. पण तरीही तिच्या गरोदरपणात तिची हवी तितकी काळजी घेतली जात नाही. तिला पाहिजे तसा मानसिक किंवा शारिरीक आधार आपल्या कुटुंबाकडून व समाजाकडून मिळत नाही. कदाचित ही कथा वाचल्यानंतर समाजाचा गरोदर स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. सर्वांनीच वाचावी अशी "अपर्णा परदेशी लिखित" एका स्त्रीचा "pregnancy to delivery" असा प्रवास दाखवणारी एक प्रेरणादायी कथा.