छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्माण प्रक्रियेतील पहिली मोठी लढाई म्हणजे प्रतापगडचे युद्ध! या युद्धाच्या जय-पराजयावर स्वराज्याचे स्वप्न साकार होणार का विरून जाणार, हे ठरणार होते. इतकी महत्वाची आणि अटीतटीची ही लढाई होती. महाराज ती लढले आणि जिंकले. पापी अफझलखानाला यमसदनास पाठवून ते थांबले नाहीत, तर स्वराज्याचा वेगाने विस्तार केला. महाराजांच्या आयुष्यातील या लढाईवरील कादंबरी रोहन बेनोडेकर या नवोदित लेखकाने अत्यंत रसाळ आणि मर्मग्राही भाषेत लिहिली आहे. ही कादंबरी वाचकांच्या काळजाचा ठाव घेईल यात शंका नाही.