बाळाचा जन्म हा कुठल्याही आई-वडीलांसाठी जीवनातील सर्वोच्च आनंदांपैकी एक परमानंद...! त्याच्या बाललीलांमध्ये ते आपलं बालपण पुन्हा जगतात आणि त्याच्या हळूहळू मोठं होण्यात त्यांच्या भविष्याची स्वप्ने तगतात.
मात्र ह्या आनंदाला दुःखाची किनार लागते बाळाना झालेल्या आजाराची आणि बाळाच्या एखाद्या साध्यासुध्या आजारानेही जीव कासावीस होणाऱ्या आई- वडीलांना जेंव्हा बाळाच्या एखाद्या जीवघेण्या, दुर्धर रोगाची लागण झाल्याचं कळल्यावर काय अवस्था होणार, याची कल्पनादेखील कुठल्याही पित्यास सहनीय नाही.
अशावेळी आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी, त्याच्या यातनांतून त्याला मुक्ती मिळवून देत त्याने जगावं, ह्यासाठी एक पिता कुठल्या अग्निपरीक्षेतून जातो, याची कहाणी सांगणारं हे पुस्तक... पिताच्या कर्तव्यकठोर वात्सल्याने आपल्या मुलाच्या आयुष्यावर घोंघावणारं मृत्युवादळ थोपवून आपला 'चिराग' आयुषतेजाने तेपत रहावा म्हणून सर्व विवंचनांना तोंड देऊन दिलेल्या लढ्याची ही कहाणी, एका सामान्य पित्याच्या असामान्य वात्सल्यसाहसाची ही गाथा नक्कीच गहीवरुन टाकणारी आहे...
त्या लढ्याला माझा सलाम...! -चिन्मय गोतमारे (IAS)
(जिल्हाधिकारी गोंदिया)