मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा ही इतिहासातील सत्यघटनेवर आधारित काल्पनिक प्रेमकथा आहे. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका स्वामीभक्ताची.. अशा स्वामीभक्तीची की, तिची इतिहासाच्या पानावर कुठेही नोंद नाही. त्यांच्या बलिदानाची दखल कुठेही घेतली गेली नाही. ही कथा आहे स्वराज्याच्या आगळ्या वेगळ्या एका गुप्तहेराची. शत्रूच्या गोटात राहून स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या शिवरायांच्या एका मावळ्याची. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबियांच्या जीवाचीही पर्वा न करणाऱ्या मराठमोळ्या सरदाराची. इमाने इतबारे स्वराज्याची सेवा करताना उमलत जाणाऱ्या त्याच्या अनोख्या प्रीतीची.. ही कथा आहे मार्तंड आणि मेहरच्या निःस्वार्थ प्रेमाची.. स्वराजाच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या सरदाराची..