विवाह नावाची ही कादंबरी. ही कादंबरी म्हणजे एक सामाजिक वणवा आहे.
विवाह ही स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते. परंतु तो केल्यानंतर तो टिकविणे ही तारेवरची कसरतच आहे. यातील कथानक काहीसं असंच. पुर्वी विवाह व्हायचे. ज्यात करार नव्हता. आता विवाह करारानुसार होवू लागले आहेत. जे पटकन तुटतात. परंतु ते तुटायला नको. याचं महत्व मांडणारी कादंबरी. यात विवाह केल्यानंतर काय होतं? विवाह म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आहेत. त्या सर्वांची उत्तरंही यात आहेतच. ते जाणण्यासाठी वाचा, माझी विवाह ही कादंबरी.