ते आईबाप. बिचाऱ्यांनी बालपण व तरुणपणात नानाविध यातना शोषल्या. वाटत होतं, म्हातारपणात आपली मुलं आपली सेवा करतील. परंतु घडलं उलट. मुलांनी त्या दोघांनाही वृद्धाश्रमात टाकलं. परंतु पुढं काय घडलं? शिवाय त्यांनी तरुणपणात व बालपणात कोणत्या यातना शोषल्या? ते आपल्याला माहित नाही. साधारणतः वृद्धाश्रम, तरुण व बालपणातील यातना. हा वृद्धाश्रमाचाच प्रवास असतो. असं सर्वसाधारण लोकांचं मत असतं. ते पुस्तकाकडे दुर्लक्ष करतात. परंतु या पुस्तकात एक वेगळंच कथानक आहे की जे मनाला भावेल, रुचेल. यात शंका नाही. आपण ही पुस्तक वाचावी व एक फोन अवश्य करावा ही विनंती.