“अनाहिताची डायरी” ही कथा म्हणजे, एका अबोल, अदृश्य प्रेमाची जिवंत झालेली कहाणी आहे. मंगेश दोरकेसरांनी लिहिलेली ही कहाणी केवळ शब्दांची मालिका नाही, तर ती भावना, आठवणी, आणि हळुवार क्षणांनी भरलेली एका संवेदनशील स्त्रीचं आत्मदर्शन आहे.
कथेमध्ये “अनाहिता”च्या मनातील प्रत्येक लाटा वाचकांच्या हृदयावर आदळतात. तिची बेचैनी, उत्कंठा, मनातील गोंधळ, आणि तरीही मल्हारसाठी असलेले निस्सिम प्रेम, हे इतके प्रामाणिकपणे व्यक्त झाले आहे की ते वाचताना डोळे पाणावतात.
अब्दुल शेख.