मी मराठी। अलका पुणतांबेकर
बड़ोदरा गुजरात। -----------------
माझी माय मराठी
तिचे मी लेकरू
आई विना जगू कसे
तिला कसे विसरु
कावियत्री ने खरेच म्हंटले आहे. आई ला कोणी विसरते काय? नाही ना? मग माझी माय मराठी भाषा आहे तर तिचे संवर्धन करणे ही माझेच कर्तव्य आहे.
आज मराठी भाषाची अवस्था कृष्ण पक्षाच्या इंदू प्रमाणे झाली आहे. हळू हळू ही भाषा लोपणार तर नाही ना अशी भिती मनात जागृत होत आहे.आज ची तिची दयनीय अवस्था मनाला घोर लावित आहे.