३१ जानेवारी २०२१ ला आम्ही पहिली ते अकरावी पर्यंत एकत्र शिकलेली अशी शाळेतील मित्र मैत्रिणी पुन्हा नव्याने भेटली. जवळपास पन्नास वर्षांनंतर! अर्थातच आजच्या प्रथेप्रमाणे व्हॉट्स ॲप चा गृप तयार करण्यात आला. त्यानंतर खूप फोनाफोनी, मेसेजेस ची देवाणघेवाण चालतच होती. पण तरीही एकाच वेळी सगळ्यांना माझ्या भावना कळाव्यात ह्यासाठी केलेलं हे लिखाण! खात्री आहे की सर्व वाचकांनी जरी नाही तरी ज्यांनी हे अनुभवलं आहे त्यांच्या भावना यापेक्षा फार काही वेगळ्या नसतील. त्यांना नक्कीच पुन:प्रत्ययाचा आनंद अनुभवता येईल.
- राजा महा