२०२० साली अनुभवला होता हा अनुभव. अचानक संध्याकाळी आभाळ भरून आलं होतं. थोड्या वेळाने पाऊस पडला काही वेळ. वातावरणात मृद्गंध पसरला आणि चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. काळ्याभोर ढगांनी आकाश काळवंडून गेल्याने, नेहमीपेक्षा लवकरच अंधार दाटून आला. चार महिने उन्हाळ्याची काहिली व घामाने हैराण झालेल्या मनाला, पंधराव्या मजल्यावरील घराच्या गॅलरीत रोजच संध्याकाळी जाऊन बसायची सवय लागली होतीच, आज त्या सवयीनुसार जेंव्हा जाऊन बसलो तेंव्हा आपोआपच मनात हे भाव दाटले. ते सांगावेत कोणाला असे आसपास कोणी नव्हते, म्हणून एका आंतरिक उर्मी ने मोबाईल वर टाईप केले गेले. तोच अनुभव येथे शेअर केला आहे. निसर्ग एकच अनुभव वारंवार देत नाही. रोज नव्या रुपात सामोरा येतो. पण काही क्षण कायम आठवणीत राहतात, त्या अनेकांपैकी हा एक!