व्हॉट्स ॲप वर दोन वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. मी जे लिहिले आहे त्याच आशयाचा. मला त्यातील सांगणं भावलं. पूर्वी फोन नंबर डायरीत लिहून ठेवत असत. त्या लेखाचे लेखक रोज डायरीतील पहिल्या पानावरील एक नंबर घेऊन त्या व्यक्तीला फोन करायचे. कित्येकांशी संपर्क तुटून न जाणे किती काळ लोटला होता. पण फोन केल्यावर पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित झाले त्यांचे. फोन करणाऱ्याला आणि ज्यांना केलाय त्या घेणाऱ्यांना, दोघांनाही एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती मिळाली. तो आनंद वेगवेगळ्या रितीने होत असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी ही होत असेल. पण मला ती कल्पना खूप आवडली. नेमकं त्याच काळात थोड्याच दिवसात मलाही त्याचा प्रत्यय आला. जो या माझ्या लेखात उद्धृत केला आहे. आणि मला तो प्रसंग आणि अर्थातच तो लेख उद्युक्त करून गेला हे लिहिण्यासाठी!