माझा जन्म कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावात झाला असुन सध्या मी गोरेगाव ( पश्चिम) मुंबई येथे वास्तव्यास आहे. मी मुंबईतील पवई येथील लार्सन अॅण्ड टुब्रोत 'सिनियर प्रोडक्ट डिझाईन ऑफिसर' या पदावर ३० वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील एका फ्रेंच कंपनीत म्हणजे Heurtey Petrochem मध्ये...More
माझा जन्म कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावात झाला असुन सध्या मी गोरेगाव ( पश्चिम) मुंबई येथे वास्तव्यास आहे. मी मुंबईतील पवई येथील लार्सन अॅण्ड टुब्रोत 'सिनियर प्रोडक्ट डिझाईन ऑफिसर' या पदावर ३० वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील एका फ्रेंच कंपनीत म्हणजे Heurtey Petrochem मध्ये १० वर्षे 'मेकॅनिकल डिझाईन मॅनेजर' या पदावर सेवा निवृत्त झाल्यानंतर पुन्हा लार्सन अॅण्ड टुब्रोत 'डिझाईन कन्सल्टंट' म्हणून ३ वर्षे काम केले. सुरवातीला लार्सन अॅण्ड टुब्रोत ३० वर्षे काम करत असताना मी दररोज संध्याकाळी ते रात्री उशीरापर्यंत फ्रिलान्स डिझाईन चे काम करुन माझी Designwell नावाची कंपनी चालवत होतो. आज माझे वय ६४ वर्षे असुन सध्या मी चित्रकला , फोटोग्राफी, वाचन , लेखन व दररोज अनेक लोकांशी संपर्कात राहुन त्यांचे अनुभव व माझे अनुभव एकमेकांशी शेअर करण्यात माझा वेळ व्यतीत करतो.