मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकारीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकारी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकारीनिमित्त भरत भ्रमण झाले....More
मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकारीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकारी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकारीनिमित्त भरत भ्रमण झाले. मुख्यत्वे नौकारी नागपुर, मुंबई आणि पुणे येथे झाली. लेखनाची आवड जोपासली. नागपूरच्या लाखे प्रकाशन याने राजेंद्र बेनोडेकर यांचे पुस्तक "मागोवा: प्राचीन भारताचा" हे प्रकाशित केले. तसेच व्यक्ति कथासंग्रह व्यक्ति मैत्र आणि नाती हे पुस्तक शॉपीझेन यांनी प्रकाशित केले. अजून एक पुस्तक प्रकाशित लवकरच होणार आहे.
Book Summary
श्रीकृष्ण चरित्र अतिशय मनमोहक आहे. यात गोकुळ सुटेपर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे भक्त, कवि, साधक यांच्याकरिता अनमोल ठेवाच आहे. किती गुण गावे, किती कथा सांगाव्या, यशोदा-कृष्ण, राधा-कृष्ण, गोपी आणि गोपालां सोबतचा माखनचोर अशी किती रुपे आठवावी आणि साठवावी डोळ्यात ! मनाला अतिशय आमोदीत करणारा, निकोप वृत्ती उल्हासित करणारा असा हा, ह्या अवतरातील पहिला आणि अमृतानुभव देणारा कालखंड. ह्याच कृष्णाने अखिल जगतावर मोहिनी घातली आहे. राधेला आणि गोपिकांना आपल्या बासरीने मनमोहित करणारा कृष्ण, आजही, प्रत्येक हळव्या आणि स्वच्छ मनात आपले स्थान टिकवून आहे. भक्ति रसात डुंबणाऱ्या प्रत्येक भाविकांना पावणारा आणि भावणारा कान्हा हा एकच असा देव आहे की भक्त आणि देव यांच्यातील द्वैत आपसूकच गळून पडते. असा हा मनमोहक मोहन अष्टमीला प्रत्येक घरात जन्म घेतो, पूजल्या जातो.