मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
मी आज १ मार्च २०२५ ला 'छावा' चित्रपट पाहिला. पहिल्यांदाच असं झालं होतं की मी चित्रपट पाहताना चित्रपटातील कोणत्याच दृश्याचे (सीन) मोबाईलने फोटो वगैरे काढले नाहीत. कारण हा नुसता चित्रपट नसून गंभीर इतिहास आहे ही जाणीव मला सतत होतं होती. अक्षरशः चित्रपट संपल्यावर माझं डोकं एकदम सुन्न झालं होतं. चित्रपटगृहात रडण्याचा आवाज तसेच सर्वत्र जी शांतता पसरली होती, मी तिचं वर्णन करू शकत नाही. आपण काहीतरी असं पाहिलं आहे जे ह्यापूर्वी कोणी इतक्या जिद्दीने कथा मांडणी करून चित्रपट रूपात दाखवलं नाही.