काल म्हणजे ०१ मे २०२५ ला पाहिला हा चित्रपट. मला आवडला. म्हणून तुम्हाला सांगितलं की जमलं तर तुम्ही देखील पहा. कोणतीही मारधाड नसलेला, हलक्याफुलक्या विनोदी प्रसंगांनी सजलेला, उत्तम अभिनयाने नटलेला, सुंदर रित्या दिग्दर्शित केलेला, थोडासा भावना प्रधान देखील आहे. बघा बुवा जमलं तर आणि इच्छा झाली तरच!