prakash Fasate - (18 July 2026)खुप सुंदर वर्णन केलंय मामा च्या नात्याचं.. मलाही आमच्या मामाची आठवण झाली. मामा, मावशी यांच्या प्रेमात आपल्याच आईची माया उतरलेली असते, आईचीच सावली असते. माझ्या मामानी मला लहान असतांना सगळं नाशिक सायकलवर फिरवलं. उन्हाळ्याच्या सुटटीत आमचं ते ठरलेले ठिकाण होतं. तुमच्या लेखामुळे जुने सगळे प्रसंग आठवले.
"मामा" हे पुस्तक एका भाचीच्या नजरेतून तिच्या मामासोबतच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा, बालपणीच्या आठवणींचा, सण-उत्सवांच्या आनंदाचा आणि जीवनात मिळालेल्या शिकवणींचा भावनिक प्रवास आहे. या पुस्तकातून मामा-भाचीच्या नात्यातील प्रेम, आधार, संघर्ष आणि सुंदर क्षण यांचा अनुभव वाचकांना मिळेल. प्रत्येक आठवण मनाला स्पर्श करणारी असून कुटुंबातील नात्यांची खरी किंमत जाणवून देणारी आहे."