संगीत सारिता - राग कसे ओळखावेत
ले. डॉ विठ्ठल श्री.ठाकूर(बारावी आवृत्ती) शास्त्रीय संगीता चा अवघड प्रवास या पुस्तकामुळे खूप हवासा आणि सुलभ होत जातो असा असंख्य संगीतप्रेमींचा अनुभव आहे .संगीत अभ्यासक ,संगीत शिक्षक, विविध संगीत व इतर कार्यक्रमाचे
सूत्र-संचालक इत्यादींना हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त ठरले आहे. पुस्तकाची थोडक्यात झलक ....
123 राग, त्यावर आधारलेली (व बहुतेक सर्वांच्या ओठावर असणारी)सुमारे 2600 विविध मराठी आणि हिंदी गीते - ज्यांचे बोट धरून रागांच्या अवघड भासणाऱ्या प्रवासाला जाताना,जी वाटाड्या ठरू शकतील - असे या पुस्तकाचे एकूण स्वरूप आहे. प्रत्येक रागाचे आरोह अवरोह व गाण्याचा समय पण दिले गेले आहेत. अशा प्रकारचे प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक.पुस्तकाचे मोठे भाग्य असे की त्याला पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांची प्रस्तावना आणि श्री. पु.ल.देशपांडे यांची शाबासकीची थाप लाभली आहे.