"महाराणी सईबाई " म्हणजे सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या ज्येष्ठ पत्नी वा महाराणी या एकाच भूमिकेतून चरित्र नायिकेचा आढावा घेणे हाच केवळ या चरित्रग्रंथकाराचा हेतू नसून नाईक-निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घराण्याची स्नुषा ,राजमाता जिजाऊ मासाहेब यांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईंच्या व्यक्तीमत्त्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे .महाराणी सईबाई यांची ' सय' अवघा महाराष्ट्र सदैव उरात जपेल आणि या ग्रंथांच्या वाचनातून वाचकांच्या मनात सईबाईंच्या कार्याचा ओलावा सदैव राहील अशीच अपेक्षा आहे.