मराठ्यांच्या इतिहासात येसुबाईंचा त्याग अपूर्व आहे. त्यांनी स्वराज्य ,स्वधर्म आणि स्वातंत्र यासाठी आपले सारे जीवन वेचले. मराठेशाहीच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली 'राज स्री ' म्हणजे येसूराणी. त्यांची आकलन शक्ती व कारभाराची कुवत पारखून शिक्के कटारीचे अधिकार छत्रपती शिवाजी राजांनी त्यांना बहाल केले होते. सूर्यासारख्या तळपदार प्रखर तेजाने तळपणार्या छत्रपती संमाजीराजांच्या सुख-दुःखात सहभागी होणारी ही एकच व्यक्ती म्हणजे येसूबाई राणीसाहेब. आपल्या पुत्रास छत्रपती न बनवता आपल्या दिरास छत्रपती राजारामास राज्याचे सिंहासन अर्पण करून ,या मराठा राणीने इतिहास घडविला आणि इतिहासात निस्वार्थीपणाचा व त्यागाचा एक महान आदर्श निर्माण केला.येसूबाईची प्रत्येक कृती आम्हा प्रत्येक स्त्रीला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही.