"राजा नष्ट अरिष्ट योग घडला
दुर्गादि नाना स्थळे
घेती म्लेंछ समग्र देश,
हबशी प्राबल्य जाले बळे
राजाराम विदेश दक्षण,
दिशे चंद्रावरी राहिला
रोगे क्षीण परंतु सुकृत बळे तारामती रक्षिला "
ताराबाई धैर्यपुरुषा शूरुत्व आणि बळे
घेवोनी नृप राम स्वामीसह.तेजे प्राप्त झाली दळे
लंघोनी परदेश दुर्गम स्थळे कृष्णा नदीचे तिरी
सातारा गड रक्षिला स्वकिजनी जावोनी बैसे शिरी
तारा रक्षि सातारा अवघड , शिखरा लाविकाशा फरावरा
पाछा केला नगारा सह दळ निकरा येऊनी घाली घेरा केले नाना उपाया न दिसतं ,जया सोडी आशाभिमानी जे जे किल्ले न आले वगळूनी ,तया जात पाछा निदानी
तुळजा प्रसन्न झाली | पातशाही हाती आली |
जय लक्ष्मी माळ घाली | शिवाजीस आदरे ||
दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी | ताराराणी रामराणी | भद्रकाली कोपली ||
असे ताराराणीचे वर्णन कवी कवींद्र गोविंद
यांनी केलेले आहे.