पन्नास वर्षाच्या कालखंडात या संस्थानाला अल्पायुषी राजे मिळाल्याने ब्रिटिश प्रतिनिधींची वाढीस लागलेली हुकूमशाही वृत्ती, ग्रामाधिकारी ,भट ,सावकार ,वकील, कारकून यांच्या अन्यायकारक कारभाराने रयतेचे होणारे शोषण या पार्श्वभूमीवर 1874 ला राजर्षीशाहू महाराज कर्मवीर संस्थांनच्या गादीवर विराजमान झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने भारावलेल्या या कालखंडात आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक स्वातंत्र्य या वादात न पडता सामाजिक लोकशाहीचा पाया घालण्यात राजर्षीशाहूराजे यांचा सिंहाचा वाट
कसा होता याची केलेली सैद्धांतिक चर्चा या ग्रंथामध्ये आहे .छत्रपती शाहूमहाराजांच्या चरित्रात्मक ग्रंथापेक्षा निव्वळ समाज क्रांतिकारक म्हणून केलेल्या कार्याची स्वतंत्रपणे ओळख व्हावी व ती ओळख समाजापर्यंत पोहोचावी हाच या ग्रंथाचा मूलभूत हेतू आहे.