रेखा कमलाकर कुलकर्णी-देशपांडे
एम. ए. (अर्थशास्त्र) बी. एड.
लग्नापूर्वी दोन वर्ष उदगीर येथे विद्यावर्धिनी शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी 1986 ते1988
लग्नानंतर पूर्णवेळ गृहिणी
वाचन भरपूर पण लिखाण तसे कमी
अगदी आठवी नववीला
असल्यापासून वाचन व लेखनाची आवड प्रत्यक्ष लिखाण ग्रॅज्युएशन...More
रेखा कमलाकर कुलकर्णी-देशपांडे
एम. ए. (अर्थशास्त्र) बी. एड.
लग्नापूर्वी दोन वर्ष उदगीर येथे विद्यावर्धिनी शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी 1986 ते1988
लग्नानंतर पूर्णवेळ गृहिणी
वाचन भरपूर पण लिखाण तसे कमी
अगदी आठवी नववीला
असल्यापासून वाचन व लेखनाची आवड प्रत्यक्ष लिखाण ग्रॅज्युएशन पासून.
1) महाविद्यालयीन शिक्षणा सोबत वाद-विवाद,वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा उस्फुर्त वकृत्व, असंबंध वक्तृत्व अशा स्पर्धांमधून सहभाग व पारितोषिके
2) सकाळ पेपरला
सहज सुचले म्हणून
सदरात चारोळी लेखन 2001
3) सकाळ पेपरच्या विडंबन काव्य स्पर्धेत अकराशे कविता मधून उत्तेजनार्थ पारितोषिक.2001
4) वेळोवेळी अभंग व लघु लेख प्रसिद्ध
विविध ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत पुरस्कार
1) शब्द सेतू लक्षणीय काव्य काव्यनिर्मिती पुरस्कार 2020
2) काव्य स्पंदन काव्योत्कर्ष पुरस्कार 2020
3)शब्द सेतू दैनिक नाविन्यपूर्ण विशेष सदर लेखन पुरस्कार 2020
4) शब्द सेतू महा स्पर्धेची अंतिम विजेता म्हणून सन्मानित 2020
5) शब्द सेतू काव्यकुबेर पुरस्कार 2020
6) काव्य शिल्प साहित्य मंच सदश्य 2022
7) गझल मंथन साहित्य संस्था पुणे 2022 विभाग कोषाध्यक्ष 2020
पासून
8) विविध गझल मुशायऱ्यात सहभाग
9) वैद्यनाथ महाविद्यालय परळी येथे महिलादिन काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक 2012
लघु लेख, ललित,अभंग, षडाक्षरी, अष्टाक्षरी,चित्रकाव्य, ओळकाव्य, काव्यांजली, मुक्त काव्य, हायकू, गझल, भारुड, लावणी, ओवी,गझल सर्व काव्यप्रकारात लेखन
आवडता काव्य प्रकार अष्टाक्षरी
250 ते 300 पेक्षा जास्त ऑनलाइन स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ते उत्तेजनार्थ पर्यंत प्रशस्तीपत्रे
' सोनसळी रान ' काव्यसंग्रह ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रसिद्ध
Book Summary
नमस्कार
काव्य रसिकहो
ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी सरांनी प्रस्तावना आणि काव्य विश्वात दिग्गज असलेले विठ्ठल वाघ सर, विजय जोशी सर डॉ.निशिकांत श्रोत्री सर यांनी शुभेच्छापरपत्ररूपाने आपले आशीर्वाद दिले मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते प्रकाशक डॉ.रवींद्र वेदपाठक यांच्या सुर्यगंध प्रकाशनाने *सोनसळी रान* हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.वेळोवेळा माझे पती मुलगा वमुलीचे सहकार्य मला मिळाले या सगळ्यांना मी धन्यवाद देते
रसिकांच्या हाती हाकाव्य संग्रह देताना खूप आनंद होत आहे
जीवनात आलेले अनुभव, मनातील भावतरंग, स्त्रीमनातील हळव्या भावना,प्रेम , नाते संबंध सामाजिक प्रश्न आणि आजूबाजूचा निसर्ग या साऱ्यांचे वेळोवेळी माझ्या मनात उठलेले तरंग कवितेत प्रतिबिंबित झाले आहेत जवळपास सर्वच कविता (अष्टाक्षरी)गेय स्वरुपात आहेत ८० कविता मधून ८० विविध विषय हाताळले आहेत ' सोनसळी रान ' एका आगळ्या वेगळ्या जगाची सफर घडवून आणेल काव्य रसिकांनी या रानात नक्कीच फेरफटका मारून काव्यानंद घ्यावा