कधीचा आवरण्यासाठी पेंडिंग ठेवला होता. जीव होत नव्हता एकेकाळी जतन करून ठेवलेल्या, निगुतीने राखलेल्या आणि वेळोवेळी उपयोगी पडलेल्या बऱ्याच गोष्टी आवरताना.
ज्यांना स्मृती लगडलेल्या आहेत अशा काही गोष्टी पुन्हापुन्हा न्याहाळल्या- फाईल्स, फोटो, कात्रणे, पुस्तके असं काहीबाही !
एक मात्र खरं - " खूप " झाला होता पसारा ! दरवेळी घर बदललं की त्यांत झालेली वाढ नजरेत असायची. उपयुक्तता संपलेल्या, गेल्या काही वर्षांमध्ये हातही न लावलेल्या पण असू देत, कधीतरी लागल्या तर असाव्या हातासरशी म्हणून साठवलेल्या अनेकविध गोष्टी !
वाटत होतं कोणीतरी येईल मदतीला म्हणून काही दिवस रेंगाळलो, टाळाटाळ केली पण ----
थोडं मनाला खटकतंही होतं आवराआवरी करताना ! आतमध्ये बरीच काही उलथापालथ सुरु होती. तरीही नेटाने बरंच स्वच्छ केलं. जे टाकवलं, ते टाकलं ! सगळ्या कसोट्यांवर वस्त्रगाळ होऊनही टिकलेलं काही ठेवलं वंशजांसाठी !
आणि मग सहज "हंस " दिवाळी अंकातील रेवा दुभाषींच्या "परीघ " कथेतील वाक्याला ठेचकाळलो -
Just now I have got the window seat ! And Mom is saying we have to get down as we have reached home now!
But is that the reason to leave the window seat?