**प्राजक्तची शाळा कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न..**
मुंबई येथील चतुरस्त्र लेखिका कस्तुरी देवरुखकर यांच्या " प्राजक्तची शाळा " या कथासंग्रहाचे प्रकाशन दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी मालाड येथील डी.ए.व्ही हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाट्य संगीतकार श्री. मयुरेश माडगावकर यांच्या हस्ते झाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली फुटाणे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री हरीश जालान , संस्थेच्या सहसचिव श्रीमती स्मिता जोग , श्री किशोर लट्टू , संस्थेचे विश्वस्त श्री.भूषण पैठणकर तसेच शाळेचे शिक्षक श्री विजय नातू व श्री सुहास हिर्लेकर , श्री.सुभाष कणसे व शाळेचे सर्व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला.
"ज्या शाळेत आपण शिकलो, आपला सर्वांगिण विकास झाला. त्याच शाळेतील वार्षिक कार्यक्रमात आपल्याला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात यावे अन् कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांच्या हस्ते आपला कथासंग्रहाचे प्रकाशन व्हावे या सारखा दुसरा कुठलाच मोठा पुरस्कार असूच शकत नाही. लेखनाचे सार्थक झाले." असे मनोगत लेखिका कस्तुरी देवरुखकर यांनी व्यक्त केले.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन असल्याने सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाविष्कार सादर केले.
कथासंग्रह - प्राजक्तची शाळा
लेखिका - कस्तुरी देवरुखकर
प्रकाशन - शाॅपिजन
पृष्ठ - १५० , मूल्य - २९१/
शाॅपीजन कडून सवलतीच्या दरात मूल्य - २०२/- रू.
पुस्तक http://www.shopizen.in वर तसेच अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध आहे.