स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. सिद्धी या पुस्तकातील जास्तीत जास्त कथा या स्त्रीप्रधान कथा आहेत. स्त्री मनात आणेल तर काही करू शकेल. ती जितकी हळवी तितकीच धाडसी, तितकीच कठोर होऊ शकते. या कथासंग्रहात लेखिकेने स्त्रीची विविधं रूपं दाखवली आहेत. कधी आईच्या रूपात, कधी सूनेच्या, कधी सासूच्या, कधी बहिणीच्या, कधी मैत्रिणीच्या असे असंख्य रूपाचे स्त्री स्वभावाचे कंगोरे या कथासंग्रहात उलगडून दाखवले आहेत. हा कथासंग्रह तुम्हाला नक्की आवडेल.