आपल्या अवती भवती घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल लहान मुलांच्या मनात कुतूहल असते. या कुतूहलातून त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि यातूनच त्यांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मुले प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करतात, विचार करतात. अशावेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा प्रश्नांमागे विज्ञान असते, हे मुलांना समजावून सांगता आले पाहिजे.
उषा महाजन लिखित 'प्रश्न मनातील उत्तर विज्ञानातील' या पुस्तकातून मुलांच्या भावविश्वातील निवडक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी आहे. पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे या प्रश्नांची उत्तर एक कथानक गुंफुण ते अधिक वाचनीय करण्याचा वेगळा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सर्वांनी आवर्जुन वाचावे असे हे पुस्तक आहे.