लेखिका उषा महाजन यांच्या प्रस्तुतच्या 'दत्तदर्शन' या ग्रंथात आपणास एकूण ५१ विविध श्रीक्षेत्रांचे दर्शन घडते. हे सर्व
वाचताना त्या-त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष हजर असून, श्रीदत्त गुरूंचेच
दर्शन घेतो आहोत, अशी अनुभूती आपल्या मनास नक्कीच स्पर्श करते.
भक्तीभावनायुक्त अशी रसाळ लेखन शैली लाभलेल्या
लेखिका उषा महाजन यांनी प्रत्येक क्षेत्राचे स्थान, महात्म्य नेमक्या
शब्दांत मांडले आहे. यामुळे या लेखनात प्रवास वर्णनाची रोचकता आली आहे, हे विशेष आहे.