बदलणाऱ्या भारताच्या या नव्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेत आम्हीही तुम्हा रसिक वाचकांसाठी घेऊन आलो आहोत आमचा हा पहिला दिवाळी अंक 'दीपालिका ई- दिवाळी अंक २०२३' ! आपल्या मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि तिच्या समृद्धतेचा अभिमान असणाऱ्या आम्हां साहित्यिकांचा 'साहित्यरंजन' हा एक परिवार. आम्ही साहित्याशी निगडित अनेक उपक्रम करतो आणि ह्या दिवाळी च्या पावनपर्वातला आमचा सर्वात मोलाचा उपक्रम म्हणजे आमचा हा अंक. या अंकात कथा, कविता, ललित लेख आणि इतरही मनोरंजनात्मक असे साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.
मला खात्री आहे की, आमचा हा ई दिवाळी अंक आपणांस नक्की आवडेल.