‘नऊ वायफळ कथा’ या शिर्षकाखाली एकूण नऊ विनोदी लघुकथा आहेत. या कथा ताज्या, अगदी आजच्या वर्तमानातल्या आहेत. ‘मुंबई’ या महानगराला विचारात घेऊन कथानिर्मिती झाल्यामुळे सर्व कथांमध्ये शहरीपणा आहे आणि या शहरीपणावरचं व्यंगात्मक टीका आहे. ही टीका अगदी बेधडक, बोचऱ्या स्वरूपाची नसून सावधपणे, सौम्यपणे आणि मिश्कील पद्धतीने आहे. कथासंग्रहाचा मूळ उद्देश्य फक्त नि फक्त मनोरंजन आणि हास्यनिर्मिती आहे.