एकेकाळी टुमदार, निसर्ग वरदान असलेले पुणे आज कोटीच्या लोकसंख्येत उतरलं आहे. विद्येचं माहेरघर असलेले हे शहर,उद्योग क्षेत्रातील प्रगतीमुळे प्रगतिमान झालं आहे. असं असलं तरी जुन्या वास्तू,वाडे,मंदिरे, रस्ते ऐतिहासिक अशा वैभवाच्या इतिहास खुणा पुण्याने जपल्या आहेत.राधिका पंडित ह्यांनी तो सुवर्णकाळ, त्यांच्या कसदार लेखणीतून, पुण्याच्या गतवैभवाची साक्ष घेऊन आपल्यापुढे उलगडला आहे. किमान पाच-सहा दशके मागे जाऊन रम्य आठवणीच्या हिंदोळ्यावर आरुढ होऊन,आपल्या पुढे त्यांनी आठवणी सादर केल्या आहेत. नकळत आपणही त्या काळात पोहोचतो आणि त्या काळाशी केव्हा एकरूप होतो ते आपलं आपल्याला कळतच नाही.
सुधीर कोर्टीकर औरंगाबाद