२५ वर्षाच्या कालावधीत कलेच्या विविध क्षेत्रात काम करणार्या तरुण रक्ताळा वाव देण्याचा जितका प्रयत्न आम्ही केला तितकाच प्रयत्न जुन्या निष्ठावंत साहित्यकारांना आणि त्यांच्या स्मृतींना देण्याचा केला. नव्या-जुन्याचा सुयोग्य संगम हे श्री सर्वोत्तमचे वाशिष्ठ्य मानावे लागेल.
तब्बल दोन तपं आम्हाला कथारूपी ठेवा पुरविणार्या पद्मश्री प्राप्त लेखिका श्रीमती मालती जोशी यांना आदरांजली देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे या रौप्य महोत्सवी वर्षात पद्मश्री मालती जोशी स्मृती कथास्पर्धा घेण्यात आली.ज्याला अतिशय उत्तम आणि उस्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. निकालाप्रमाणे पहिला पांच क्रमांकाच्या विजेते कथांचे समावेश या विशेषांकात करण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन.
`श्री सर्वोत्तम'च्या ह्या विशेषांकात लोकमाता अहिल्याबाईंच्या ३००व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना श्रद्धासुमन अपर्ण केली आहेत डॉ. देवीदास पोटे आणि सुमित्राताई महाजन ह्यांनी. पुराणकाळातील भारतवर्षाच्या कल्पनेतून आधुनिक प्रगत भारतापर्यतच्या इतिहास लेखांकित केले डॉ. बाबासाहेब तराणेकर, प्रशांत पोळ ह्यांनी. वाचकांच्या मनात ज्याचे कार्य जीवंत आहे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे प्रा. नरेन्द्र पाठक, अरुण म्हात्रे, स्वरदा गोडबोले, प्रशांत गौतम, बाळासाहेब जोगदंड, प्रमोद माळी, नीलमाधव वसंत भुसारी, डॉ. स्वाती गोलबोले, सुरेखा शहा, राधिका इंगळे, श्रीति राशिनकर आणि किरण डोंगरदिवे ह्यांनी. चित्रपट व दूरदर्शनाच्या मालिकांमधून प्रेक्षकांना सुपरिचित असलेल्या दोन कलाकारांचा अरुंधती - मधुराणी प्रभुळकर (मेधा खिरे) आणि श्री अजय पूरकर (वसुधा गाडगीळ) परिचय मुलाखतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहेत. प्रवास वर्णनांच्या बोरबर संस्था परिचय व स्थान महात्म्य ह्यांच्या ही समावेश केला आहे. मॅनेजमेंटवर प्रकाश टाकणारे लेखक ही आहेत श्री श्रीनिवास कुटुंबळे, डॉ. मुरहरी केळे, डॉ. आशुतोष राराविरकर इ.
कथा विश्व भरपूर प्रमाणात वांचाकांचे मनोरंजन करणार आहे. श्री विवेक मेहेत्रे यांचे हास्यचित्र आहेतच शिवाय भरगच्च कवितांचा वर्षांव सुद्धा या अंका वाचयला मिळणार आहेत. श्री सर्वोत्तम हे इंदुरहुन निघणारे नियतकालिक असले तरी बृहन्महाराष्ट्रातील व त्याच बरोबर महाराष्ट्रातील लेखकांचे साहित्यही ह्यात आहे.