गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांच्या मुलाखती संग्रह. एकदा वाचून अनुभवा. सामान्य ज्येष्ठांचे असामान्य व्यक्तिमत्व. या मुलाखती घेताना मला प्रकर्षाने जाणवले की प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे चालते-बोलते इतिहासाचेच नव्हे तर अनुभवाच्या पुस्तकाचे पान आहे. त्यांच्या आठवणींमध्ये आपल्या समाजाचा प्रवास, संस्कृतीतील बदल, कौटुंबिक कथा व जीवनमूल्यांचा खोल ठसा दडलेला आहे.