"माणसाच्या मातीतील कथा" हा कथासंग्रह ग्रामीण आणि शहरी जीवनाच्या मधल्या वाटेवरून माणसाच्या अंतरंगात डोकावणारा प्रवास आहे. या संग्रहातील कथा माणसाच्या भावनांपासून, त्याच्या नातेसंबंधांपासून, आणि त्याच्या मातीशी असलेल्या नात्यापासून उगम पावतात.
प्रत्येक कथेत मानवी अनुभवांची वेगळी छटा आहे कुठे हरवलेपण, कुठे संघर्ष, कुठे प्रेम, तर कुठे मूक विरोध. या कथा गावाच्या मळ्यावरून सुरू होतात आणि शहराच्या गजबजाटात पोहोचतात, पण त्यांचं मूळ मात्र मातीच्या सुगंधातच खोल रुजलेलं असतं.
ही पुस्तक वाचकाला केवळ कथा वाचायला सांगत नाही, तर त्या कथा जगायला लावते त्यातल्या पात्रांत, त्यातल्या काळजाच्या धडधडीत स्वतःला शोधायला भाग पाडते.