सहज म्हणून एखादं
फुलझाडाचं रोपट कुंडीत लावावं आणि आपल्या नकळत मोठं होऊन त्याच्या फुलांच्या सुगंधांनं अख्ख घर सुवासित होऊन जावं..
भक्तीभावाने छोटासा निरंजन देव्हाऱ्यात पेटवावा अन् त्याच्या तेजाने सारं घर उजळून निघावं...
अगदी काहीसं तसंच माझं आणि माझ्या कवितांचं नातं आहे , असं म्हणता येईल...
छंद म्हणून कविता लिहाव्यात आणि वैद्यकीय व्यवसाय सांभाळून जसा वेळ मिळेल तसं स्वतः टाईप करून सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात..
रसिकांचा प्रतिसाद मिळत जावा अन् त्यांच्या प्रोत्साहनामुळे या काव्यसंग्रहाचा जन्म व्हावा...