मला वाटतं माणसाप्रमाणे प्रत्येक गाणं देखील आपलं स्वतःचं नशीब घेऊन जन्माला आलेलं असतं! कारण तसं नसतं तर काही गाणी, गुणवत्ता असून देखील कां मागे पडली असती? कां हि गाणी रसिकांच्या मनातून हरवली गेली? कां या गाण्यांनी रसिक मनाला दिर्घ काळ मोहिनी घातली नसावी ? कां? मग अशा हरवलेल्या गाण्यांचा शोध सुरु झाला. अशाच काही गाण्यांचा शोध या पुस्तकात प्रस्तुत केलेल्या गाण्यातून घेतलाय. हि गाणी तुम्ही आम्ही नक्की एकेकाळी ऐकली होती. पण आज मात्र आपल्याला हि गाणी आठवावी लागतात.
-धनंजय कुलकर्णी