रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या स्मरणिकेचा, सन २०२५ चा विशेषांक आपल्या हाती देताना आम्हास आनंद होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात झालेले रुपांतर निश्चितच आनंददायी आहे. या पुण्यनगरीत कोथरूडच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाला एक वलय प्राप्त झाले आहे .
स्वांत सुखाय परोपकारायच हे ब्रीद वाक्य घेऊन गेली पंचवीस वर्षांची सुखेनैव वाटचाल ........
एक आनंददायी अनुभव म्हणजेच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ ! रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेल्या या स्मरणिकेत सवंगडीतील सारस्वतांचे काही लेख, ललित, प्रवासवर्णने, वैचारिक लेख व कवितांचा समावेश आहे.