"काव्य सरींचा प्राजक्त" मनसोक्त बहरल्या नंतर भावबंध प्रस्थापित करीत कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे यांचा रसिक वाचकांसाठी " ओंजळ मौक्तिकांची " द्वितीय काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. या ओंजळीत आहेत परंपरा,जीवनमर्म,नाती, सणवार, प्रेम, संस्कार, भक्तीभाव, निसर्ग रुपी विविध आयामी मौक्तीकांचा बहरलेला गंध.आपल्या बहु आयामी काव्य रचनांतुन जीवन गाणे मनाच्या अथांग तळाच्या भावविश्वात गंध वेडी स्वप्न फूले जल संजीवन प्राशन करत नवचैतन्याने निसर्गाशी एकरूप होत फूलपाखरु, वृक्ष,फूलांसोबत रमल्या आहेत. हे काव्यातुन अधोरेखित केले आहे. प्रेमाची अनुभुतींच्या विविध रचना मनाचा ठाव घेतात.
-सौ.शरण्या अभय भिसे देशपांडे.( सातारा )
(साहित्यिका,लेखिका,कवयित्री)