या मुलाखती घेताना मला प्रकर्षाने जाणवले की प्रत्येक ज्येष्ठ/वृद्ध व्यक्ती म्हणजे चालते-बोलते इतिहासाचेच नव्हे तर अनुभवाच्या पुस्तकाचे पान आहे. त्यांच्या आठवणींमध्ये आपल्या समाजाचा प्रवास, संस्कृतीतील बदल, कौटुंबिक कथा व जीवनमूल्यांचा खोल ठसा दडलेला आहे.
या मुलाखतीच्या संग्रहातून मला सर्वात मोठा मिळालेला धडा वा संदेश म्हणजे "जीवनाचे मोल त्याच्या लांबीमध्ये नाही, तर त्याच्या अनुभवात आहे." ज्येष्ठ नागरिकांच्या कथा ऐकताना हे पुन्हा पुन्हा पटले की आपला भूतकाळ समजून घेतल्याशिवाय भविष्य घडवणे शक्य नाही. या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी त्यांच्या आठवणी आणि भावना मनमोकळेपणाने माझ्या समोर मांडल्या, ही माझ्यासाठी एक अमूल्य देणगी आहे.