मी लहानपणी पुस्तकात पिंपळपान ठेवायचे. त्याला खूप जपायचे. हळूहळू ते सुकून पानाचे जीर्ण तुकडे गळायला लागायचे पण पानाच्या रेषा जाळीसारख्या पारदर्शक होऊन उरायच्याच. पहिले प्रेम असेच कायम राहते जाळी बनून. तो खुळेपण पुन्हा परतून येणार नसतो. ते प्रेम खरे तर असते स्वतावरचे . स्वताच्या उमलू लागलेल्या तारुण्यावरचे . मनातल्या स्वप्नाळूपणावरचे .