मानवी आयुष्य हे अतिशय संघर्षमय असते. मग दिवसभरात होणारा ताण तणाव त्यांना आपण रात्री झोपल्यानंतर पूर्णपणे विसरून जातो. आणि काही क्षणांसाठी आपण अतिशय सुखद क्षणांमध्ये जगतो. याचवेळी आपण काल्पनिक स्वप्न ही पाहतो जसे की आपण बालपणात खूप काही कथा ऐकलेले असतात परीचे जग आणि त्यामुळेच आपण स्वप्न सुंदर कल्पना करतो काही क्षणासाठी तरी आपल्याला सुखाचा भास होतो. आणि याच सुंदर सुखाचे वर्णन करण्यासाठी कवयित्रींनी ही सुंदर कल्पना आपल्या कवितेत उतरवली आहे.