गंधाळ चाफा म्हणा, मधाळ शब्दलता म्हणा, मनस्वरूपी तर कधी आत्म्याचा शापित दागिना म्हणा, ज्याची त्याची आपापली ओळख....
एक मुलगी, एक बहीण, एक मैत्रीण, एक प्रेयसी, एक बायको, एक समाजामधील व्यक्ती, आपल्या आयुष्यातील स्व व्यक्तिमत्व म्हणा, हवं तर जाणकार म्हणा..
नाही महती एवढी मोठी पण मानाचं स्थान...More
गंधाळ चाफा म्हणा, मधाळ शब्दलता म्हणा, मनस्वरूपी तर कधी आत्म्याचा शापित दागिना म्हणा, ज्याची त्याची आपापली ओळख....
एक मुलगी, एक बहीण, एक मैत्रीण, एक प्रेयसी, एक बायको, एक समाजामधील व्यक्ती, आपल्या आयुष्यातील स्व व्यक्तिमत्व म्हणा, हवं तर जाणकार म्हणा..
नाही महती एवढी मोठी पण मानाचं स्थान हवं असा "प्रण" असणारी म्हणा --> प्रत्येक मुलीचं स्वप्न कदाचित.... ओळखीने जर भागत असतं तर कवितेला, भावनेला, शब्दांना अर्थ उरला असता का??
आपली ओळख कशी असावी, तर ती एखाद्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपता यावे अशी, ज्याचं मन भावनेन जड झालय, दुःखाने व्यापलंय त्याला दोन सांत्वनाचे, आधाराचे शब्द देणारी, मान-सन्मानाने प्रत्येकाची ओटी भरणारी...
अर्थात ओळखीला देखील आपल्यामुळे एक ओळख मिळावी अशीच असावी आपली ओळख... मी हिरवा चाफा... माझी ओळख तुम्हाला माझ्या कविता करून देतीलच .....
फार्मासिस्ट सौ शिवाली शैलेश वाघमोडे (हिरवा चाफा).
Book Summary
ही कविता मनुष्याच्या जीवनातील कर्म, प्रारब्ध आणि त्यांच्या परिणामांवर भाष्य करते. देव, दानव, राजा, प्रजा, गरीब किंवा श्रीमंत—कोणीही कर्माच्या नियमापासून सुटत नाही, हा कवितेचा मुख्य संदेश आहे. मोह, माया, लोभ, क्रोध, अहंकार आणि हव्यास यांसारख्या भावनांचे गाठोडे प्रत्येक जीव आपल्या खांद्यावर वाहत असतो. याच कर्मांच्या ओझ्यामुळे सुख-दुःख, यश-अपयश आणि जीवनातील संघर्ष निर्माण होतात.