Mrudula Raje - (15 December 2024)संसाराचे ताणेबाणे विणत गुंफलेली ही कथा भावनात्मक तर आहेच, पण बोधप्रद सुद्धा आहे. सूनबाई सासूवरची पराकोटीची चीड व्यक्त करते, तेव्हा कळते की ती निर्दयी नाही, तर भोग भोगून विवेकशून्य झालेली आहे. आपल्याच पतीच्या, मुलीच्या मनाचाही विचार करता न येण्याइतकी भावनाशून्य झालेली आहे; त्यामुळे आपले भवितव्य ओळखून पुढचे सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसली आहे. तिच्या मुलीने तिला दिलेली शिक्षा हा तिच्या नशीबाचा भोग, की देवाघरचा न्याय? ह्यातून तिचे वर्तन सुधारेल की अधिकच उग्र बनेल? वाचकांना विचारप्रवृत्त करून आपले कथानक थांबवणे, हीच यशस्वी कथा-लेखनाची कसोटी असते. सिद्ध लेखिका विजया ताई वाड ह्यामध्ये "सर्वोत्कृष्ट" पदावर आहेत,हे साहित्य-रसिक जाणतातच! 🙏💐
00
ऋचा दीपक कर्पे - (14 December 2024)सशक्त कथा.... माणूस वाईट नसतो, वेळ वाईट असते. राग वेळेवर धरावा माणसावर नव्हे.